अहमदनगर

शेवगावातील 9 गावात येणार महिलाराज

अमृता चौगुले

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत गावकारभारी निवडीसाठी 25 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, 9 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी मिळणार आहे. तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी एकून 25 हजार 193 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 13 हजार 167 महिला व 12 हजार 26 पुरुष आहेत.

प्रशासन युद्ध पातळीवर निवडणुकीची तयारी करीत असून, दोन दिवसांत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर मतदान प्रक्रियेस जवळपास इतर शंभर कर्मचारी निवडले जाणार आहेत. निवडलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अमरापूरचे सरपंचपद नामाप्र व्यक्तीस आरक्षित आहे. येथे 1 हजार 490 महिला व 1 हजार 329 पुरुष असे 2 हजार 829 मतदार आहेत. प्रभुवाडगाव – सरपंचपद अनु.जाती व्यक्ती राखीव. मतदार 789 स्त्री 705 पुरुष एकूण 1 हजार 494, दहिगाव-नेचे सरपंचपद अनु. जाती महिला राखीव. मतदार 3 हजार 76, स्त्री 2 हजार 912 पुरुष एकूण 5 हजार 988, खामगाव-सरपंचपद नामाप्र महिला राखीव. मतदार 450 स्त्री 403 पुरुष एकूण 853, जोहरापूर-नामाप्र महिला राखीव. मतदार 878 स्त्री 783 पुरुष एकूण 1 हजार 661, रांजणी-सरपंचपद खुला प्रवर्ग व्यक्ती राखीव. मतदार 723 स्त्री 651 पुरुष एकूण 1 हजार 374, खानापूर – सरपंचपद खुला प्रवर्ग महिला राखीव. मतदार 652 स्त्री 620 पुरुष एकूण 1 हजार 272, वाघोली- सरपंचपद खुला प्रवर्ग महिला राखीव.

मतदार 1 हजार 185 स्त्री 1 हजार 71 पुरुष एकूण 2 हजार 256, रावतळे कुरुडगाव – सरपंचपद खुला प्रवर्ग महिला राखीव. मतदार 681 स्त्री 624 पुरुष एकूण 1 हजार 305, भायगाव – सरपंचपद खुला प्रवर्ग महिला राखीव. मतदार 780 स्त्री 727 पुरुष एकूण 1 हजार 507, सुलतानपूर खुर्द-सरपंचपद खुला प्रवर्ग महिला राखीव. 697 स्त्री 663 पुरुष एकूण 1 हजार 360, आखेगाव ति.- खुला प्रवर्ग महिला राखीव. मतदार 1 हजार 766 स्त्री 1 हजार 538 पुरुष एकूण 3 हजार 304.

SCROLL FOR NEXT