अहमदनगर

जामखेड येथील प्रसिध्द व्यापारी महेंद्र बोरा यांचा पोखरीजवळ कार उलटून अपघाती मृत्यू, तीन गंभीर जखमी

अमृता चौगुले

जामखेड पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघातात निधन झाले असून गाडीत आसलेल्या त्यांच्या पत्नी रेखा महेंद्र बोरा, वय (५२,) सुन जागृती भुषण बोरा (वय २८), नात लियाशा भुषण बोरा (वय ६) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जामखेड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगरकडे रवाना करण्यात आले आहे. मुलगा भुषण शांतिलाल बोरा (वय ३४) हा किरकोळ जखमी झाल्याने त्यास उपचार करून सोडण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, जामखेड येथील भांड्याचे प्रसिध्द व्यापारी महेंद्र बोरा हे आपल्या कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी राजस्थानला गेले होते. देवदर्शन करुन जामखेडकडे परतताना सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी नगर जामखेड रोडवरील पोखरी पुढे असलेल्या धोकादायक वळणावर आली असता कार चालकाला अंदाज न आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्या ठिकाणी असलेल्या पुलावरून अचानक सदर चारचाकी गाडी पलटी होऊन भीषण अपघात झाला.

मयत महेंद्र बोरा यांच्यावर सायंकाळी पाच तपनेश्वर अमरधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मयत महेंद्र बोरा हे व्यापारी जितेंद्र बोरा यांचे बंधू होते. ते अतिशय मनमिळावू होते. त्यांच्या निधनाने व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त केली आहे. अपघात झालेले ठिकाण हे अपघात प्रवणक्षेत्र असून या ठिकाणचे वळण व अरूंद पुलाचे कठडे नसल्याने यापुर्वीही अनेक अपघात घडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT