अहमदनगर

कर्जतमध्ये पुन्हा पाण्याचा ठणठणाट; महावितरणने थकबाकीमुळे तोडले वीजजोड

अमृता चौगुले

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या पाणी योजनेचे वीजजोड महावितरणने थकबाकीमुळे तोडले आहे. यामुळे कर्जतकरांना पाणीटंचाईस तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे शहरात पुन्हा पाण्याचा ठणठणाट जाणवनार आहे. कर्जत शहराला खेडच्या भीमा नदीच्या फुगवटेच्या पाण्यावरून पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी उच्च दाबाची वीज वाहिनी देण्यात आली आहे.

महावितरण कंपनीची पाणीपुरवठ्याची थकबाकी एक कोटी 24 लाख रुपये राहिल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा तोडला आहे, अशी माहिती महावितरणच्या कार्यालयातून सांगण्यात आले. वीजजोड तोेडल्याने शहरामध्ये आजपासून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जोपर्यंत वीज कनेक्शन जोडले जात नाही तोपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

चालू बिल भरणे आवश्यक : जमदाडे
महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास जमदाडे म्हणाले, नगरपंचायतने पाणीपुरवठा योजनेचे किमान चालू बिल भरणे आवश्यक आहे. महावितरण स्वतः वीज तयार करत नसून, वीज खरेदी करून तिचा पुरवठा करते, यामुळे वसुली होणे अपेक्षित आहे. पैसे भरले तरच महावितरणला वीज पुरवठा सुरळीत करता येणार आहे.

पाणीपुरवठा योजनांची थकबाकी किती
वास्तविक पाहता नगर जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामपंचायती, नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिका या सर्वांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कोट्यवधींची थकबाकी आहे. असे असताना ही फक्त नगरपंचायतचे पाणीपुरवठा योजनेचा थकबाकीमुळे वीज कनेक्शन महावितरणच्या अधिकार्‍यांनी तोडले. यामुळे नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा आहे.

शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा महावितरणने तोडला आहे. नगरपंचायत महावितरणला नियमित पैसे भरत आहे. मात्र, थकबाकी दाखवून कनेक्शन तोडले. नगरपंचायतचीही सर्व शासकीय कार्यालयांकडे थकबाकी आहे. यामध्ये महावितरणचाही समावेश आहे. या वसुलीसाठी महावितरणचे कार्यालयाला टाळे ठोकू शकतो.

                                                     – नामदेव राऊत, माजी नगराध्यक्ष

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT