पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : विखे घराणे व नाभिक समाजाचे अतूट नाते असून, ते जपण्यासाठी यापुढील काळातही समाजोपयोगी कामे करू. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत नाभिक समाजातील होतकरू तरुणांना व्यवसायासाठी साधने देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार सुजय विखे यांनी दिली. तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने पाथर्डी येथे संत सेना महाराज भवनात संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात पार पडला. त्या वेळी विखे बोलत होते. संत सेना महाराज मंदिराच्या सभा मंडपासाठी विखे यांनी खासदार निधीतून 20 लाख रुपये दिले होते. याप्रसंगी खासदार विखे व आमदार मोनिका राजळे यांचा सत्कार करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ.मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, माणिक खेडकर,चारुदत्त वाघ, विष्णुपंत अकोलकर, सुनील ओहोळ, काकासाहेब शिंदे, बजरंग घोडके, बंडू बोरुडे, अजय रक्ताटे, संजय बडे, सुनीता दौंड, महंत माधवबाबा, धनंजय बडे, राहुल कारखेले, अशोक चोरमले, जे. बी. वांढेकर उपस्थित होते. आमदार राजळे म्हणाल्या, की सभा मंडपासाठी 30 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यातून काम लवकरच सुरू होणार आहे. संत सेना महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली. प्रतिभाताई कोकाटे यांचे कीर्तन व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ज्ञानेश्वर गायके यांनी प्रास्ताविक केले. गणेश चातुर यांनी आभार मानले.
हेही वाचा :