अहमदनगर

खंडाळा : उसात बिबट्याचा बछडा

अमृता चौगुले

खंडाळा; पुढारी वृत्तसेवा : ऊस तोडणी सुरु असताना बिबट्याचा छावा आढळला. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे शेतकरी राधाकिसन ढोकचौळे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी सुरू असताना दुपारी ऊस तोडणी मजुराला छावा आढळला. दरम्यान, आसपास बिबट्या किंवा त्याची मादी असेल या भितीने मजूर घाबरून पळाला.

शेजारीच निळवंडे धरणाच्या कालव्याचे खोदकाम सुरु असल्याने तेथील कामगाराने त्या छाव्याचा फोटो काढला. तोडणी मजुराने ऊस मालकाला याबाबत निरोप दिला, परंतु ते येण्याअगोदर छावा उसात निघून गेला. बिबटे त्या भागात आहेत, हे सर्वांना माहित आहे. वनविभागाला वारंवार कळविले. चार महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांनी वर्गणी करून पिंजरा आणला.

त्यात बोकड ठेवला, परंतु तकलादू व नादुरुस्त पिंजर्‍यातून बिबट्याने बोकडाला ओढून फस्त केले. सध्या रब्बी हंगाम सुरु झाला आहे.
शेतकर्‍यांची गहू , हरबरा , कांदा लागवडी सुरु झाल्या आहेत. महावितरणकडून सध्या रात्री 12 ते सकाळी 8 या वेळेत विद्यूत पुरवठा सुरु आहे. त्यामुळे शेतकरी बिबट्याच्या भितीने रात्री पिकास पाणी देणे अवघड झाले आहे.

SCROLL FOR NEXT