file photo  
अहमदनगर

संगमनेरात वकिलाला जबर मारहाण

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणां च्या विरोधात दरोड्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील राहणारे वकील प्रसाद राजेंद्र कड लग हे लोकअदालतीसाठी घुलेवाडीतील जिल्हा न्यायालयाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने आलेले चारचाकी वाहन ट्रॅक्टर-ट्रॉलीला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्याचवेळी समोरच्या बाजूने दुचाकीवरुन वकील कडलग हे पुढे येत असल्याचे दिसल्याने बोलेरोच्या चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचे वाहन ट्रॅक्टर-ट्रॉलीला जाऊन धडकले.

हा सगळा प्रकार पाहून वकील कडलग यांनी आपली दुचाकी जागीच उभी केलीअसता धडकलेल्या बोलेरोमधील चार/पाच इसम खाली उतरले आणि त्यांनी थेट शिवीगाळ करू लागले. अनिल गुंजाळ यांनी गाडीतून खाली उतरत 'त्या' वकिलाच्या दुचाकीची चावी काढून घेत मागचा पुढचा विचार न करता त्यांच्या कानाशिलात लावीत जीवे मारण्याची धमकी दिली. दुसर्‍या दिवशी न्यालयास सुट्टी असल्याने कडलग आले नाही. घटनेच्या तिसर्‍या दिवशी मंगळवारी टंकलेखनाच्या कामासाठी न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडून समोरच्या बाजूच्या असलेल्या एका दुकानाकडे जात असताना एक चारचाकी गाडी त्यांच्याजवळ आली.

गाडीतील व्यक्ती खाली उतरल्या. या सर्वांनी कडलग ा मारहाणही केली. तर त्यातील एक जनाने कंबरेला लावलेली गुप्ती दाखवली व 'पैसे दिले नाही तर तुझा मुडदा पाडू, तुझे बाकीचे वकील लोकं काय करतात तेच पाहतो' असा दमही भरला. अनिल गुंजाळ व त्याचे चार-पाच साथीदार प्रसाद कडलग यांना मारहाण करीत असताना त्यांनी त्यांच्या हातातील अर्धातोळा वजनाची सोन्याची अंगठीही काढून घेतली. त्याच दरम्यान हा प्रकार पाहून न्यायालयाच्या परिसरातील अन्य वकील मंडळीही त्यांच्या मदतीला धावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT