अहमदनगर

नेवासा : येळकोट येळकोट; नेवासा दुमदुमले ; खंडोबा-म्हाळसादेवी दर्शनास गर्दी

अमृता चौगुले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : श्री खंडोबारायाची सासूरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथे चंपाषष्ठी उत्सवानिमित्त येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत व संत महंतांच्या हस्ते तळीभंडारा करून खोबर्‍याची उधळण करण्यात आली दिवसभरात लाखभर भाविकांनी खंडोबा म्हाळसादेवीचे दर्शन घेतले.  नेवासा बुद्रुक येथील पुरातन खंडोबा-म्हाळसादेवी, बानूमाता मंदिरामध्ये भक्त संभाजी ठाणगे यांच्या अधिपत्याखाली सकाळी 9.30 वाजता उद्धवमहाराज मंडलिक, महंत सुनीलगिरीमहाराज, गहिनीनाथ महाराज, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, कोंडीराम पेचे यांच्या हस्ते तळीभंडारचा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेवक नंदकुमार पाटील, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले,काकासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

नव्याने बांधलेल्या खंडोबा-म्हाळसादेवी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठ प्रमुख म्हणून कोंडीराम महाराज पेचे, विजय महाराज पवार यांनी सेवा दिली . यावेळी श्री. खंडोबा म्हाळसादेवी सच्चिदानंद बाबा व नारदमुनी मंदिर स्ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मुरलीधर कराळे, उपाध्यक्ष एकनाथ रेडे, सचिव सर्जेराव चव्हाण, सहसचिव गोकुळ जायगुडे, विश्वस्त प्रभाकर बोरकर, सुभाष जपे, गणपत नळकांडे, अशोक मारकळी, रमेश काशीद, नामदेव कुटे, एकनाथ डोहोळे, रावसाहेब पेचे, रंजना भाकरे या विश्वस्तांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.

चंपाषष्ठीनिमित्त पुरातन व नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा मंदिरातील मूर्तीस वेदमंत्राच्या जयघोष करीत अभिषेक घालण्यात आला. पुरातन खंडोबा मंदिरामध्ये व नवीन मंदिरात या दोन्हीही मंदिरांवर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती. पुरातन मंदिराच्या बाजूस नव्याने बांधलेल्या खंडोबा-म्हाळसादेवी मंदिरातही भाविकांनी त्रैलोक्यस्वामी, नारदमुनी,भगवान दत्तात्रय, सच्चिदानंद बाबांंचे दर्शन घेतले. याठिकाणी उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चंपाषष्ठीनिमित्त पहाटेपासूनच येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी खंडोबा मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती. भाविकांना वांगे भरीत बाजरीच्या भाकरीचा महाप्रसाद देण्यात आला. पुरातन खंडोबा मंदिरात वांगे भरीत प्रसादासाठी नेवासा येथील समर्पण फाऊंडेशनच्या वतीने डॉ.करणसिंह घुले यांनी जळगाव येथील वांगे भरीत प्रसादासाठी देण्यात आली.

दर्शनासाठी मान्यवरांची गर्दी

चंपाषष्ठी उत्सवाचे महत्त्व लक्षात घेता खंडोबारायाची सासूरवाडी नेवासा बुद्रुक येथे खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट देऊन म्हाळसादेवी खंडोबादेवाचे दर्शन घेतले.

SCROLL FOR NEXT