कोळगाव : पुुढारी वृत्तसेवा : कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामांमध्ये कृत्रिम वाळू वापरण्यासंबंधी ग्रामस्थांनी नगर-दौंड रस्ता अडवण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर उपविभागीय अभियंता यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रस्ता रोको मागे घेतला.
कोळगाव ग्रामस्थांनी आज गुरूवारी सकाळी रस्ता रोको आंदोलनास सुरुवात केली. उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पिंगळे, नायब तहसीलदार निलेश वाघमारे व पोलीस निरीक्षक जानकर, चाटे यांच्या समवेत आंदोलकांशी चर्चा झाली. त्या चर्चेनुसार बांधकाम विभागाने बाळासाहेब नलगे यांना लेखी पत्र दिले.
ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची निविदा प्रत तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच बांधकामा बाबत ग्रामस्थांना अपेक्षित असणार्या गोष्टी वरिष्ठांना कळवून त्यांच्या सुचनानुसार काम करण्यात येईल, तोपर्यंत काम बंद ठेवण्याविषयी संबंधित ठेकेदारांना कळविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. तत्पूर्वी याच पत्रात, अंदाजपत्रकानुसार आरसीसी काम प्रगतीत असून त्यासाठी कृत्रिम वाळू वापरण्यात येत आहे. काँक्रिटीकरणासाठी अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार रिव्हर्सिबल ड्रम काँक्रीट मिक्सर वापरण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार नैसर्गिक वाळू वापरा विषयी ग्रामपंचायतची कसलीही हरकत नाही तसे कळवल्याचे यात नमूद केले आहे.
पुढील सूचना येईपर्यंत काम बंद ठेवण्याचा ठेकेदारांना कळविण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलन मागे घेतले.
आंदोलनात माजी उपसभापती बाळासाहेब नलगे, माजी सभापती पुरुषोत्तम लगड, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंंत नलगे, कुकडी कारखान्याचे संचालक सुभाष लगड, मच्छिंद्र नलगे, विश्वास थोरात, कोळगावचे उपसरपंच नितीन मोहारे, शरद लगड, माजी सरपंच विठ्ठल नलगे, सदस्य विजय नलगे, संतोष मेहत्रे, संजय नलगे, सोसायटी अध्यक्ष नंदकुमार लगड, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण खेतमाळीस, चिमणराव बाराहाते, प्रहार चे मिठू शिरसाठ, दादासाहेब निरफळ, नितीन डुबल, दादा राऊत, योगेश बांदल, ओंकार नलगे, सहभागी झाले होते.
ग्रामीण रुग्णालय कामाच्या ठेकेदारीमध्ये माझा काहीही संबंध नसून, विना अडथळा दर्जेदार काम होऊन दवाखाना लोकांच्या सेवेत यावा या हेतूने वेळ मिळेल तसा कामाच्या ठिकाणी असतो. काही ग्रामस्थ जाणून-बुजून रुग्णालयाच्या बांधकामात अडथळा आणून काम बंद करत आहे.
-अमित लगड, ग्रामपंचायत सदस्य.