कर्जत : पुढारी वृत्तसेवा : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणार्या कर्जत बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी 18 जागांसाठी 231 अर्ज दाखल झाले. शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.
आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे या दोघांमध्ये या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष पाहावयास मिळणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक उमेदवारांनी कर्जत व चोंडी येथे जोर-बैठका काढल्या आहेत. अनेकांना उमेदवारी अर्ज भरून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यात अनेक दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे.