अहमदनगर

गुंडगिरीविरोधात जामखेडला मोर्चा

अमृता चौगुले

जामखेड; पुढारी वृतसेवा : जामखेड शहराला भयमुक्त करण्यासाठी गावगुंडांवर कठोर कारवाईची मागणी अ‍ॅड. अरुण जाधव यांनी केली. खंडणीसाठी कलाकेंद्रांवर गुंडांनी महिलांना मारहाण व छेडछाड करून धमकी दिली. मालमत्तेचे नुकसान केले. या घटनेच्या निषेधार्थ 24 मार्च रोजी सकाळी जामखेड येथे राष्ट्रवादीचे नेते प्रा. मधुकर राळेभात व वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

या गावगुंडांना पाच जिल्हे हद्दपार केले पाहिजे, अशी मागणी प्रा. राळेभात यांनी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव तुपेरे, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, उपाध्यक्ष सनी सदाफुले, काँग्रेसचे राहुल उगले, लोकअधिकारचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतीश पारवे, संभाजी ब्रिगेडचे कुंडल राळेभात, आदिवासी नेते विशाल पवार, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT