अहमदनगर

झेडपीत ट्रॅप; शिक्षण विभागातील महिला कर्मचाऱ्याची चौकशी !

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात लाचलुचपत पथकाने मेडिकल बिल काढण्यासाठी मागणी करण्याच्या आरोपात एका महिला कर्मचारी हिस ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेकॉर्डिंगमध्ये अर्थ विभागाचा एक उल्लेख असल्याचे समजले.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, शिक्षण विभागातील एका महिला कर्मचारीकडे मेडिकल बिले काढण्याचा टेबल आहे. दरम्यान, एका कर्मचाऱ्याने आपले बिल काढण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे दिली होती, त्यानुसार आज गुरुवारी सकाळी 12 वाजेच्या सुमारास अचानक पथकाने महिला कर्मचारीस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT