पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : शहरातील जय भवानी चौकात राहणार्या किरण लाटणे यांच्या राहत्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 95 हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केेला. काल पहाटे दोन वाजता हा प्रकार घडला. चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. याबाबत लाटणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. किरण लाटणे यांचे शहरात इलेक्ट्रिक दुकान आहे. शहरातील जय भवानी चौकात ते राहतात. गुरुवारी (दि. 23 ) सकाळी लाटणे यांची आई उठल्यानंतर त्यांना स्वयंपाक घरातील कपाटाची उचकापाचक झाल्याचे लक्षात आले. घराचे सेफ्टी गेट तोडल्याचे दिसले. कपाटातील सोन्याचे दागिने व पॅन्टच्या खिशातील रोख आठ हजार रुपये असा सुमारे 95 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला.