अहमदनगर

नारायणगव्हाणमध्ये गरिबांना मिळेना रेशन !

अमृता चौगुले

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील नारायणगव्हाण येथे स्वस्त धान्य दुकान मधून मिळणार्‍या रेशनला सर्व्हरमुळे घरघर लागली आहे. नेटवर्कच्या अडचणीमुळे नागरिकांना धान्य मिळत नाही. त्यामुळे सर्व्हरची समस्या त्वरित सोडवा, यासाठी उपसरपंच राजेश शेळके यांनी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना निवेदन दिले आहे. शिधापत्रिकाधारकांना धान्यवाटपाबाबत नारायण गव्हाण येथे वारंवार सर्व्हरच्या समस्येमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत नारायणगव्हाणचे उसरपंच राजेश शेळके यांनी तहसीलदारांना निवेदन देत समस्या सोडवण्यिासाठी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंती केली.

या निवेदनात म्हटले की, गोरगरिबांना रेशन वाटप करताना ऑनलाईन पद्धतीने केले जाते. मात्र, त्यामध्ये ऑनलाईनच्या अनेक समस्या येत आहेत मात्र, अनेक नागरिक मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. दिवसभर त्यांना मोलमजुरी करावी लागते, तर अनेकांना रेशनच्या धान्यावरच उदरनिर्वाह असल्याने मजुरीवर पाणी सोडून रेशनसाठी दिवसभर बसून राहावे लागते. त्यामुळे त्यांना इतर खर्चासाठी मजुरीतून येणार्‍या पैसा मिळत नाही. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार, अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत तहसीलदारांनी गांभिर्याने लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत. या जाचातून गोरगरीब जनतेची सुटका करावी असे निवेदनात म्हटले आहे.

नायब तहसीलदार गणेश आढारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी उपसरपंच राजेश शेळके, गणेश शेळके उपस्थित होते.
ऑनलाईन धान्यवाटप गोरगरीबांसाठी मोठी समस्या बनली आहे. अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानचालकांना धान्यवाटपासाठी अडचणी येतात. दिवसेंदिवस गोरगरीब रेशन दुकानांमध्ये थांबून असतात. त्यामुळे गोरगरीब जनतेची मोठी पिळवणूक होते, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.
                                       -राजेश शेळके, उपसरपंच, नारायणगव्हाण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT