अहमदनगर

नगर : आरटीओला दमबाजी; गुन्हा दाखल

अमृता चौगुले

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक टेस्ट ट्रॅकवर गाडी घेऊन येत असताना तेथे आपली मोटारसायकल घालून 'माझी गाडी अगोदर चेक करा' म्हणत नडणार्‍या आरिफ नावाच्या व्यक्तीवर श्रीरामपूर शहर पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील भाऊसाहेब गोसावी, मोटार वाहन निरीक्षक नेमणूक – उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, दि.15 फेब्रुवारी रोजी आपण अतुल गावडे, गणेश राठोड, विकास लोहकरे, श्रीमती शीतल तळपे, श्रीमती सुजाता बाळसराफ, रोहित पवार (सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) असे आम्ही सर्वजण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याचे कामकाज परिवहन कार्यालयासमोरील टेस्ट ट्रॅकवर करत होतो.

यावेळी दुपारी 4.15 च्या सुमारास सहा. मोटार वाहन निरीक्षक रोहित पवार यांना आपण 1 वाहन ब्रेक टेस्ट करण्याकरीता टेस्ट ट्रॅकवर चालवत घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा पवार हे वाहन टेस्ट ट्रॅकवरून चालवत घेऊन येत असताना आरिफ नावाचा इसम त्याची मोटारसायकल टेस्ट ट्रॅकवर आडवी लावून पवार चालवित घेऊन येत असलेल्या ब्रेक टेस्ट करण्याच्या कामकाजात अडथळा निर्माण केला.

आरिफ यास तुम्ही ट्रॅकवरून मोटारसायकल बाजुला काढा, असे सांगितले असता त्याने 'माझी गाडी अगोदर चेक करून घ्या', असे म्हणून टेस्ट ट्रॅकवर मोटारसायकल तशीच उभी करून कामकाजात अडथळा निर्माण केला.
सुनील गोसावी यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात मोटार सायकल क्र. एम. एच. 17, एक्स 1045 वरील चालक आरिफ (पूर्ण नाव माहित नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT