अहमदनगर

नगर : अवैध वाळू वाहतूक; दोन डंपर पकडले तीन ताब्यात, पाच जणांविरुद्ध गुन्हा

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  कोरडगाव – पाथर्डी रस्त्यावरील तनपुरवाडी शिवारात मोहटादेवी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडले. वीस लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तीन जणांना ताब्यात असून, एकूण पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, कोरडगाववरून पाथर्डीकडे दोन वाळूचे डंपर येत आहेत. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा लावला असता तनपुरवाडीजवळ मोहटा फाट्यावर पोलिसांनी डंपर थांबवले.

डंपरमध्ये वाळू भरलेली होती. सुमारे आठ ब्रास वाळू व दोन ताब्यात घेतले. डंपर चालकांचे विजय अशोक चेमटे (वय 32, रा. शिंगोरी थाटेवडगाव रोड, ता. शेवगाव), गजेंद्र रघुनाथ भराट (वय 19, रा. तोंडोळी, ता. पाथर्डी), तौफिक नदीम शेख (वय 26, रा. मुंगी, ता. शेवगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून डंंपर मालकाबाबत चौकशी केली असता केशव रुस्तुम चेमटे (रा. शिंगोरी, ता. शेवगाव), सुधीर संभाजी शिरसाठ असे नावे सांगितले.

पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलिस दिनकर मुंडे, पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, मनोजर शेजवळ, पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रेय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, दत्तात्रेय गव्हाणे, संदीप घोडके, पोलिस नाईक शंकर चौधरी, संतोष लोढे, सचिन आडबल, विशाल दळवी, संदीप दरदंले, ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने केली. आरोपी विजय अशोक चेमटे सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द अहमदनगर व बीड जिल्ह्यात चार गुन्हे दाखल आहेत.

अवैध वाहतुकीवर पोलिसांच्या धाडी

जिल्ह्यात अवैध वाळू उपशाचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पाथर्डी तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने पाथर्डी तालुक्यात कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT