अहमदनगर

कर्जत : विकासाचा शिधा मीच आणला : आ. राम शिंदे

अमृता चौगुले

कर्जत; पुढारी वृत्तसेवा: कर्जत-जामखेड मतदारसंघात विकासाचा शिधा मोठ्या प्रमाणात वाटला आहे, त्याचा लाभ अनेकांनी घेतला आहे. आता श्रेय कुणीही घेतले तरी, शिधा आपणच आणला असल्याचे जनतेला चांगले माहित आहे, असा टोला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रफुल्ल नेवसे यांनी शहरात रिलायन्स कंपनीच्या पंढरीनाथ पेट्रोल पंपाचे उद्घाटन ह.भ.प. वामन खराडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार शिंदे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष उषा राऊत, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर, प्रवीण घुले, भीमराव नलवडे, सचिन पोटरे, शंकर नेवसे, काकासाहेब धांडे, विनोद दळवी, वसंत कांबळे, पोपट बोरा, डॉ. संदीप काळदाते, अ‍ॅड. नवनाथ फोडे, अल्लाउद्दिन काझी, नवनाथ लष्कर, बिभिषण खोसे यांच्यासह व्यापारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले , कर्जत शहराच्या विकासासाठी आपण अमरापूर-भिगवण, श्रीगोंदा-जामखेड व घोगरगाव ते कर्जत असे रस्त्यांची जाळे निर्माण केले. त्यामुळे त्याचा शहरात विविध व्यवसाय वाढीसाठी चांगलाच उपयोग होत आहे. विकासाचा शिधा आपण सर्वांनाच दिला आहे. शहरातील प्रतिष्ठित व्यापारी पप्पू नेवसे यांनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना शुभेच्छा. सध्या सर्वच क्षेत्रांत मोठी स्पर्धा लागलेली आहे. या स्पर्धेत टिकण्याठी प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याची गरज आहे. प्रामाणिक व्यवसाय केल्यास तो नक्कीच यशस्वी होतोे, असेही आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले. आभार अ‍ॅड. नवनाथ फोंडे यांनी मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT