अकोले : मुळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो झाले. (Pudhari Photo)
अहमदनगर

Ahilyanagar Rain Update | मुळा-प्रवरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस : पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो

भंडारदरा धरण क्षेत्रात मान्सून सक्रिय; रतनवाडी, घाटघरला पावसाने झोडपले

पुढारी वृत्तसेवा

Mula Pravara Heavy Rainfall

अकोले : गत दोन दिवसांपासून मुळा - प्रवरा पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय झाल्याने अंबित धरणानतर मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो झाले. दरम्यान पिपळगाव खांड धरणातील पाण्याचा प्रवाह मुळा धरणाच्या दिशेने झेपावला आहे.

मुळा - प्रवरा पाणलोट पाणलोट क्षेत्रात मंगळवार पासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुळा व प्रवरा परिसरातील हरिश्चचंद्रगड, पाचनई, लव्हाळी, आंबित, कुमशेत, बलठण, शिरपुंजे, घाटघर, कोलटेभे, रतनवाडी, पांजरे, उडदावणे, बारी परिसरात बुधवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे. परिणामी मुळा नदीतील पाण्याची आवक वाढत आहे. तर कोतुळेश्वर मंदिर पाणी शिरले आहे. तर ६०० दलघफु क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो झाले आहे. मुळा नदीच्या उगमावर आंबीत येथे असणारे १९३ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबीत धरण दोन आठवड्यापूर्वीच ओव्हर फ्लो झाले. अकोले तालुक्यातील अंबित धरणापाठोपाठ गुरुवारी पिंपळगाव खांड आणि पाडोशी धरण, देवहंडी धरण, वाकी धरण भरले आहे.

मान्सूनच्या दमदार बॅटिंगमुळे अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगा आता ओल्या चिंब झाल्या आहे. ओढे नाले सक्रिय झाल्याने मुळा व प्रवरा नदीचा प्रवाह वाढत आहे. तर पिपळगाव खांड धरणातील १२ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग मुळा धरणाकडे झेपावला आहे. मुळा नदीवर असणाऱ्या राहुरी तालुक्यातील २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात पाण्याची आवक सुरू होणार आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट मुसळधार पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणात गेल्या बारा तासांत ४६६ दशलक्ष घनफूट आवक झाल्याने धरणांत ३ हजार ७०० दशलक्ष घनफुटावर पाणीसाठा पोहचला आहे. तर निळंवडे धरणात ९९ दशलक्ष घनफूट पाणी आवक झाल्याने २ हजार ७२४ दशलक्ष घनफुटवर पाणी साठा पोहचला आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस व एकूण पाऊस पडल्याची पडल्याची पुढील प्रमाणे नोंद.

भंडारदारा ६१/७७४ मि.मीटर, घाटघर १५७/ ५७७ मि.मीटर, पांजरे १२५/३२७ मि.मीटर, रतनवाडी १६९/ ५३७ मि.मीटर, वाकी ८९/ १८३ मि.मीटर, आढळा १८/ ५८, निळवंडे १०४/ २२८ मि. मीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

अकोल्यात वाकी, पाडोशी, शिरपुजे, सागवी, पिंपळगाव खांड धरण भरले. वाकी धरण साठा ११२.६६ दलघफूट असून पाणी साठा ९८.९८ दवी धरण दलघफूट इतका आहे. तर शिरपूंजे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाला असुन पाणी साठा १५५ दलघफु इतका आहे. तर पाणी साठा १४८.९० दलघफूट इतका आहे. सांगवी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाला असून पाणी साठा ७१.२३ दलघफूट इतका आहे, तर पाणी साठा ५५.८७ दलघफूट इतका आहे. तसेच पाडोशी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाले आहे. पाणी साठा १४६ दलघफूट इतका आहे. पाणी साठा १२४.८६ दलघफूट इतका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT