राहुरी : पुढारी वृत्तसेवा : लग्नातील हुंड्यात राहिलेली रक्कम माहेरहून आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ फिर्याद महिलेने दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पती- निलेश महानंद करडक, सासू- कांताबाई महानंद करडक, सासरे- महानंद तुकाराम करडक, भाया- महेश महानंद करडक, जाऊ- पुनम महेश करडक, ननंद- रेखा मनोज खरात (सर्व रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) असे आरोपींची नावे आहेत.
ज्योती निलेश करडक (वय 29 वर्ष, रा. शिरसगाव ता. श्रीरामपूर. हल्ली रा. राहुरी फक्टरी, ता. राहुरी) या विवाहित फिर्यादी आहेत.
राहुरी फॅक्टरी येथील ज्योती हिचा विवाह 15 डिसेंबर 2019 रोजी निलेश महानंद करडक (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांच्या सोबत झाला होता. ज्योती करडक हिला सासरच्या लोकांनी लग्नानंतर तीन महिने चांगले नांदविले. यानंतर ती गरोदर असताना तिच्याकडून जास्त काम करून घेऊन लागले. तसेच तिला उपाशी ठेवू लागले.
यानंतर ज्योती करडक हिच्या सासरच्या लोकांनी नांदायचे असेल तर हुंड्यातील सात लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. यानंतर मध्यस्तांनी मध्यस्ती करीत तिला परत सासरी नांदण्यास पाठविले. परंतु त्यानंतरही तिचा छळ सुरूच होता.