अहमदनगर

नगर : धान्य वितरण कमिशन घोटाळा ; सेल्समनकडून खात्यातील पैसे मागविले परत

अमृता चौगुले

वाळकी : पुढारी वृत्तसेवा  : नगर तालुक्यात कोरोना कालावधीत दोन वर्षांत केंद्र व राज्य शासनाकडून मोफत धान्य गरीब कल्याण योजनेतून परवानाधारक सेवा संस्था, महिला बचत गट चालवीत असलेल्या स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गोरगरिबांना धान्याचे वितरण करण्यात आले. या धान्य वितरणातील कमिशन वाटपात मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या कमिशनची वसुली आता तहसील कार्यालयाकडून होत आहेच, सोसायटीही करत आहेत.

यामुळे टक्केवारी खाल्ली कोण अन् मधल्यामध्ये मरण मात्र सेल्समनचे होत आहे. धान्य वितरणातील कमिशन सेवा संस्थांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याऐवजी तहसीलदारांनी सेल्समनकडून व्यक्यीगत कमिशन मिळण्यासाठी संस्थेच्या सचिवांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन 'ते' कमिशन सेल्समनच्या बँक खात्यावर वर्ग केले. तहसील कार्यालयाने कोणत्या अधिकारात अन् कुणाच्या आदेशाने सेल्समनकडून कमिशन वितरणाबाबत पत्र घेतली?, तर सेवा संस्थेचे सचिव म्हणतात कमिशन वितरणाबाबत आम्ही कोणताही ठराव केला नाही. तशा प्रकारचे पत्र तहसीलदारांना दिले नाही. तहसीलदार सांगतात पत्र मिळाले, संस्थेचे सचिव म्हणतात ठरावाचे पत्र दिलेच नाही. या गोंधळाची सखोल चौकशी होऊन खरे काय अन् खोटे काय? समोर येईल. मात्र, माहिती अधिकारातून ही पत्र हाती आली आहेत. दोन्ही पत्रावर सचिवांच्या स्वाक्षरी आहेत. या प्रकरणाची तत्काळ चौकशी होणे गरजेचे आहे.

दोन वर्षातील केलेल्या धान्य वितरणाचे कमिशन शासनाकडून देण्यात आले. नगर तालुक्यातील 55 सेवा संस्था स्वस्त धान्य दुकान चालवत आहेत. सेवा संस्थेला धान्यवाटपातून कमिशन रुपाने मिळणारी दोन वर्षाची 52 लाख 11 हजार 384 रुपयांची रक्कम सेवा संस्थेच्या बँक खात्यावर जमा करण्याचा शासन नियम असताना तहसील कार्यालयाने 'ती' कमिशनची रक्कम परस्पर सेल्समनच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्याचा उद्योग नगर तालुक्यात करण्यात आला.

तसेच, दहा महिला बचत गटांच्या बाबतीत घडले असून, सुमारे सहा लाख 99 हजार 18 रुपयेचे कमिशन महिला गटाच्या बँक खात्याऐवजी दुसर्‍याच व्यक्तीच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. तालुक्यात गोरगरिबांना धान्य वितरण करण्यासाठी परवानाधारक 125 स्वस्त धान्य दुकाने आहेत. यामध्ये सेवा सोसायट्या, बचत गट आणि व्यक्तीगत आदींना धान्य वितरणासाठी परवाने दिले आहेत. सेवा संस्थेमार्फत चालवले जाणारे धान्य दुकान व धान्य विक्रीतून मिळणारे कमिशन संस्थेच्याच बँक खात्यावर जमा होत होते.

दोन्ही पत्र खरे की खोटे?

धान्य वितरणातून परवानाधारक सेवा संस्थेला मिळणारे कमिशन तहसील कार्यालयाने संमती पत्राच्या आधारे सेल्समनच्या वैयक्तिक खात्यात वर्ग केले. तर, संस्थेने कमिशनबाबत तहसील कार्यालयाला कोणतेच पत्र अथवा ठराव पाठवला नसल्याचे पत्र हाती आले आहे. तहसीलदारांना मिळालेल्या पत्रावर संस्थेच्या सचिवांची स्वाक्षरी आहे. तर, ठराव केला नसून तसे पत्र पाठविले नाही. या पत्रावरही संस्थेच्या सचिवाची स्वाक्षरी आहे. माहितीच्या अधिकारतून ही दोन्ही पत्रे हाती आली आहेत. दोन्ही पत्र खरे की खोटे? कमिशनबाबत ऐवढा खटाटोप कशासाठी? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर यायला हवे.

सेल्समनच्या खात्यावर जमा झालेले कमिशन
वाळकी ( 85,462), पिंपळगाव उज्जैनी (62,192), पोखर्डी (95,192), भोरवाडी (76, 448), पिंपळगाव माळवी (88, 246), भातोडी एक (66 हजार), भातोडी दोन (10,6000), भातोडी तीन (11, 6279), जेऊर (90, 058), धनगरवाडी (61, 082), इमामपूर (92, 502), चास (11, 0399), सारोळा कासार (15, 7255), कामरगाव (16, 0101), भोयरे पठार (50, 905), बुरुडगाव (65 हजार), खातगाव टाकळी (85, 793), हिंगणगाव ( 70, 994), जखणगाव (43, 739), निमगाव घाणा (59, 969), टाकळी खातगाव (83, 587), ससेवाडी (16, 7619), देऊळगाव सिद्धी (46, 935), आठवड (59, 835), दश्मी गव्हाण (34, 690), उक्कडगाव (35, 952), मांडवा (72967), नारायण डोहो (10, 52, 210), राळेगण म्हसोबा ( 1, 45, 215), देहरे (1, 22, 748) शेंडी (1, 44, 553), कर्जुने खारे (81, 859), वडगाव गुप्ता (2, 51, 882), मदडगाव (33, 261), टाकळी काझी (60, 753), निंबोडी (1, 15, 796) मठपिंप्री ( 39, 747), रुईछत्तीशी (1, 51 हजार), बाबुर्डी घुमट (83, 147), हातवळण (49, 183), बुर्‍हाणनगर-वारुळवाडी (42, 476), विळद (76, 751), नांदगाव (78, 130), हिवरेबाजार (12, 413), सारोळा बद्धी (59, 722), वाटेफळ (62, 500), वडगाव तांदळी (86, 536), तांदळी वडगाव (52, 437), आंबिलवाडी (48, 066), गुणवडी (69, 950), निंबळक एक (92, 870), निंबळक दोन (1, 23, 600), वडगाव गुप्ता (2, 54, 883), वाकोडी (1, 59, 958), बहिरवाडी (30, 405), चिचोंडी पाटील एक (1, 31, 484), चिचोंडी पाटील दोन (99, 040), कर्जुने खारे (1, 30, 608).

या महिला बचत गटाऐवजी अन्य व्यक्तीच्या नावावरचे कमिशन
सोनेवाडी,चास (17, 633), हिवरे झरे (55, 421), चाफेवाडी (73, 681), बाळेवाडी (42, 802), सांडवा (85, 442), पारेवाडी (46, 353), केकती (11, 5638), शहापूर (46, 584), नागरदेवळे (82, 866), नवनागापूर (1, 32, 598).

SCROLL FOR NEXT