अहमदनगर

काष्टी : पदवीधरांच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा : आ. सत्यजीत तांबे

अमृता चौगुले

काष्टी; पुढारी वृत्तसेवा : राजकारणात आपल्याला मामा बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन व वडील डॉ. सुधीर तांबेंचा जनसंपर्क वारसा लाभल्याने सर्वाच्या सहकार्याने तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळाले अन् विजय मिळविता आला. त्यामुळे भविष्यात सर्वाच्या विश्वासाला पात्र राहून पदविधरांच्या प्रश्नांसह इतर सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार, असे आश्वासन आमदार सत्यजीत तांबे यांनी काष्टीत कार्यकर्त्यांना दिले.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे आमदार सत्यजीत तांबे यांनी तालुका दौर्‍यावर येवून विविध क्षेत्रातील सर्व पक्षातील राजकीय सहकारी, पदाधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. सहकार महर्षी काष्टी संस्थेला भेट दिली. यावेळी अध्यक्ष राकेश पाचपुते यांनी त्यांचा सत्कार केला. आमदार बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली.

सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेद्र नागवडे यांची छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेवर भेट घेतली. ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. आमदार तांबे यांनी तालुक्यातील भाजप, काग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षातील सहकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते कैलासराव पाचपुते, विठ्ठलराव काकडे, माजी सभापती अरुणराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, प्रा. सुनील माने, योगेश भोयटे, बाळासाहेब पाचपुते, काशिनाथ काळे, चांगदेव पाचपुते, सर्जेराव पाचपुते, सुभाषराव पाचपुते आदी उपस्थित होते. अ‍ॅड. विठ्ठलराव काकडे यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT