Crime News  File Photo
अहमदनगर

Crime News | पोलिस असल्याचे सांगून लांबविले पुजाऱ्याचे दागिने

पुढारी वृत्तसेवा

नगर : पुढारी वृत्तसेवा

स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रूस शाळेजवळ पोलिस असल्याची बतावणी करीत पुजारी काम करणाऱ्या वृद्धाकडून तीन लाख ३९ हजार रुपये किमतीचे सुमारे पावणेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने काढून घेतले.

ही घटना मंगळवारी (दि. १५) सकाळी साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजारी विजयशंकर मुलचंद मिश्रा (वय ६१ रा. अरणगाव रस्ता) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विजयशंकर हे एका दुकानात पूजा करण्याकरिता जात असताना

दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तींनी क्लेरा ब्रूस मैदानासमोर पोलिस असल्याची बतावणी करत भुरळ पाडून त्यांच्या गळ्यातील पावणेतीन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, तीन तोळ्याच्या सोन्याच्या टिकल्या व रूद्राक्ष मणी असलेली माळ, एक तोळ्याच्या चार अंगठ्या असा तीन लाख ९० हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला.

विजयशंकर यांची नजर चुकवून सोन्याऐवजी त्यांच्या हातात कागद दिला. त्यात खडे असल्याचे आढळून आले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक योगीता कोकाटे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT