अहमदनगर

घोडेगावातील खुनाचा उलगडा; सोनई पोलिसांची कामगिरी

अमृता चौगुले

घोडेगाव; पुढारी वृत्तसेवा : घोडेगाव येथील दिव्यांग तरुणाचा खून झाल्याच्या घटनेनंतर सोनई पोलिसांनी दोघा आरोपींना गजाआड करत उलगडा करण्यात यश मिळविले. अटकेतील दोघांना 24 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. योगेश भालशंकर (रा. बर्‍हाणपूर)आणि आणखी एक अशा दोघांना पोलिसांनी अटक केली. हरिश्चंंद्र पोपट लोंढे (वय 38, रा. झापवाडी रोड, घोडेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल पोपट लोंढे यांनी सोनई पोलिसात फिर्याद दिली आहे.

हरिश्चंद्र लोंढे हा तरुण शनिवारी (दि. 15) दुपारी गावात गेला होता. तो माघारी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. लोहारवाडी ते मोरगव्हाण जाणारे शिव रस्त्यावर असलेल्या उसाच्यी शेतात रविवारी सव्वापाच वाजेच्या सुमारास जखमी अवस्थेतील हरिश्चंद्र हा अमोल यास दिसला. त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

हरिश्चंद्र व त्याचा मित्र योगेश भालशंकर (रा. बर्‍हाणपूर) हे दोघे एकाच मोटारसायकलवर घोडेगाव फिरत असल्याचे अमोल यांना समजले. त्यांनी योगेश भालशंकर याचेकडे चौकशीसाठी त्याच्या घरी गेले, पण तो घरी नव्हता. योगेश भालशंकर यानेच हरिश्चंंद्र पोपट लोंढे याला मोरगव्हाण शिवारात जबर मारहाण केली. त्यातच हरिश्चंद्रचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

डीवायएसपींची घटनास्थळी भेट
तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी गुन्हा दाखल होताच पथकाला आरोपींच्या मागावर पाठविले. पोलिसांनी योगेश भालशंकर व आणखी एका संशयिताला ताब्यात घेत अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT