नगर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर-राहुरी रस्त्यावर व्यापार्याला अडवून अपहरण करीत सोन्याच्या दागिन्यासह दहा लाख 20 हजारांची रोकड लांबविल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसानी आठ जणांना अटक केली. त्यांच्याकडून दहा लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
योगेश कैलास खरात (वय 24, रा. भोजडे चौक, ता. कोपरगाव), अनिल अण्णासाहेब मालदोडे (वय 30, रा. पिंपळवाडी, माऊलीनगर, शिर्डी, ता. राहाता), गुड्डू ऊर्फ सागर विठ्ठल मगर (वय 21, रा. हनुमानवाडी, कान्हेगाव, ता. कोपरगाव), सोनू ऊर्फ सोन्या सुधाकर पवार (वय 25, रा. हॉलिडे पार्क शेजारी, शिर्डी, ता. राहाता), किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. जि. अहमदनगर), आकाश पांडुरंग शिंदे (रा. पाण्याचे टाकीजवळ, विळद, ता. जि. अहमदनगर), महेश विठ्ठल वाघ, सोनू ऊर्फ शुभम रावसाहेब ठोंबे (दोघे रा. खांडके, ता. जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. धनंजय प्रकाश काळे (रा. रामवाडी, सवंत्सर, ता. कोपरगाव), मयूर अनिल गायकवाड (रा. इंदिरानगर, ता. कोपरगाव) हे आरोपी पसार झाले.
अनिल रामचंद्र घाडगे (रा. घोरपडवाडी, ता. राहुरी) 12 जून 2023 रोजी मोटारीने राहुरीकडे येत असताना एकाने त्यांना अडवून मोटारीच्या काचा फोडल्या. चालक व अनिल घाडगे यांना अज्ञातस्थळी नेऊन मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लांबविले. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, हा गुन्हा योगश खरात (रा. कोपरगाव) व त्याच्या साथीदारांनी केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना कळले.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सावळीविहीर फाट्यावर सापळा लावून चार संशयितांना पकडले. त्यांचे दोन साथीदार पळून गेले. पकडलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. साथीदारांची नावेही सांगितली. त्यानुसार पोलिसांनी किरण कोळपे, आकाश शिंदे, महेश वाघ, सोनू ऊर्फ शुभम रावसाहेब ठोंबे यांना विविध ठिकाणांवरून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याची साखळी, कार, मोबाईल, हत्यारे असा एकूण 10 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना नंतर राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई उपनिरीक्षक तुषार धाकराव, भाऊसाहेब काळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोज गोसावी, अतुल लोटके, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष खैरे, विजय ठोंबरे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोलिस कॉन्स्टेबल आकाश काळे, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, किशोर शिरसाठ यांच्या पथकाने केली.
हेही वाचा