अहमदनगर

नेवासा : सरपंच पदाची धोकेदारी अन् तरुणाची करारी बुलेटस्वारी!

अमृता चौगुले

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : गावकारभारीसाठी गावागावात राजकीय शेकोट्या पेटल्या आहेत. नेवासा तालुक्यातील माका येथील एका तरुणाला दोन्ही गटाने सरपंच पदासाठी शेवटपर्यंत झुलवत ठेवले अन् ऐनवेळी शब्द पलटावत पत्ताच कट केला. ईष्येला पेटलेला 'भावी'चे स्वप्न पाहत बुलेटस्वारीने अडीच तासात नगर-नेवासा रिटर्न गेला अन् सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. नेवासा तालुक्यात ही करारी बुलेटस्वारी चर्चेचा विषय ठरली आहे.

नेवासा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. माका हे राजकीय दृष्ट्या मोठे गाव. या गावातील पप्पू नावाच्या तरुणाला दोन्ही गटाकडून मागासवर्गीयासाठी राखीव सरपंच पदाचा शब्द देत झुलवत ठेवले.

'तुुमची उमेदवारी फिक्स, दुसरीकडे कोठे जावू नका, चर्चा करू' असे गोड बोलत अखेरच्या क्षणी दोन्ही गटाने त्याची उमेदवारी नाकारली. स्वाभिमान दुखावल्याने पप्पूने बुलेटला किक मारली जात पडताळणीसाठी नगर-नेवासा अडीच तासात रिटर्न प्रवास करत सरपंच पदाचा अर्ज दाखल केला. दोन वाजता नेवासा येथून बुलेटस्वारी करत निघालेला पप्पू जात पडताळणी करत साडेचार वाजेच्या सुमारास नेवाशात पोहचले अन् उमेदवारी अर्ज दाखल केला अन् करारीबाणा दाखवून दिला.

धोकेबाजांना धडा शिकविण्यासाठी जिद्दीने सरपंच पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आश्वासन देवूनही ऐनवेळी गद्दारी करणार्‍यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.
                                                              – पप्पू, सरपंच पदाचे उमेदवार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT