खरवंडी कासार : पुढारी वृत्तसेवा : खरवंडी कासार येथील बंद घरात मागील बाजुची खिडकी तोडुन घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागीने, असा नऊलाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याबाबत ज्ञानेश्वर अर्जुन आव्हाड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पाथर्डीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील तपास करीत आहेत.
खरवंडी येथे ज्ञानेश्वर अर्जुन आव्हाड राहतात. ते व कुटुंबातील इतर सदस्य समोरच्या खोलीमधे झोपले होते. घराच्या मागील बाजुची खिडकी तोडुन चोरटे घरात आले. त्यांनी कपाटातील एक लाख अठ्टावीस हजार रुपयाची रोकड व सोन्याचे दागीने असा नऊलाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. रात्री दहा वाजल्यापासुन ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आव्हाड पहाटे उठल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले.
श्वानपथक, ठसेतज्ञ यांना बोलविण्यात आले होते. नगरच्या स्थानिक गुन्हेशाखेचे अधिकारी व कर्मचारी खरवंडीत दाखल झाले आहेत. तसेच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील कर्मचा-यासह घटना स्थळाला भेट देवुन आले.
दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पाटील करीत आहेत. खरवंडी गावात यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.