अहमदनगरच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशपदीअंजू. एस. शेंडे यांची नियुक्ती केली आहे. Pudhari Photo
अहमदनगर

अहमदनगर जिल्हा न्यायाधीशपदी प्रथमच महिला न्यायाधीशांची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

अहमदनगर: पुढारी वृत्तसेवा : अहमदनगरच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी प्रथमच महिला न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर येरालगड्डा यांची अमरावती येथे बदली झाली. त्यांच्या जागी धाराशिव (उस्मानाबाद) येथून अंजू. एस. शेंडे यांची बदली झाली आहे.

नगरच्या दोनशे वर्षांच्या जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी महिलेची नियुक्ती झाली आहे. न्यायाधीश शेंडे १८ सप्टेंबरनंतर सूत्रे स्वीकारतील. तसेच त्या शिर्डीच्या साईबाबा संस्थांनाच्या विश्वस्त समितीच्याही अध्यक्ष असतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT