अहमदनगर

पारनेर : शिंदेंच्या ‘व्हिक्टर’चा एक्स्पोत दबदबा

अमृता चौगुले

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : शिर्डी येथे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पुढाकारातून आयोजिलेल्या महापशुधन एक्स्पो देशपातळीवरील प्रदर्शनात अश्व गटात राहुल शिंदे यांच्या 'व्हिक्टर'ने प्रथम क्रमांक पटाकाविला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते उद्योजक अभिजीत शिंदे यांनी पारितोषिक देण्यात आले.

राहुल शिंदे यांना अश्वपालनाचा छंद आहे. आजच्या काळातही शिंदे कुटुंबाने पूर्वापार चालत आलेली अश्वपालन परंपरा टिकवली आहे. त्यांच्याकडे 15 उमदे घोडे आहेत. त्यातील महाराष्ट्रामधील नावाजलेला स्टॅलियन व्हिक्टर घोडा असून, त्याची ऊंची 66 इंच, त्यास देवमन असून, त्याचे ब्रिडींग रिझल्टही उत्तम आहेत. प्रदर्शनात त्यास पाहण्यास अनेक लोकांची गर्दी होत होती.

प्रदर्शनाच्या उद्घाटनांतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या अश्वाचे कौतुक केले. शिर्डी पशुधन प्रदर्शनात देशभरातून 35 अश्व येथे आले होते. विविध गुण अंकानुसार अश्वमधून 'व्हीक्टर'ने प्रथम क्रमांक पटकाविला. शिर्डीच्या प्रदर्शनात 'व्हिक्टर'ने शेतकर्‍यांबरोबर राजकारण्यांचेही लक्ष वेधले. राहुल शिंदे यांनी आपल्या घोडेस्वारीचा छंद जोपासत तबेल्यात अनेक नामांकित अश्व ठेवले आहेत. राज्यभरातून अनेक जण या तबेल्याला भेट देत असतात.

SCROLL FOR NEXT