अहमदनगर

पाथर्डी : पडळकरांचे भाषण कामकाजातून वगळा

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर केलेले लक्षवेधी भाषण कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी राजे धर्माजी गर्जे घराण्याचे वंशज तथा पाथर्डी तालुका भाजप कार्यकर्ते नागनाथ गर्जे, प्रा सनील पाखरे यांनी केली आहे. भाषणात पडळकर यांनी वंजारी राजे आद्य क्रांतीकारक धर्माजी प्रतापराव गर्जे यांचा उल्लेख वारंवार धर्माजी मुंडे असा केला.

एका देशभक्त क्रांतीकारकाची ओळख बदलून खोटा इतिहास रचण्याचा प्रयत्न पडळकरांनी केला. एका जबाबदार अशा वरिष्ठ सभागृहात खोटी माहिती दिली. ती माहिती कामकाजातून वगळावी, सभागृहासमोर खरा इतिहास मांडावा व देशभक्त क्रांतीकारक राजे धर्माजी गर्जे यांना न्याय द्यावा, अशी मागणी नागनाथ गर्जे, प्रा पाखरे यांनी विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोर्‍हे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे केली. मुंबई येथे त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

SCROLL FOR NEXT