अहमदनगर

नगर : अतिक्रमणप्रश्नी नेवासा नगरपरिषदेपुढे पेच

अमृता चौगुले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा  : संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍या रस्त्यात भाविकांना अतिक्रमणांचा अडथळा होत असल्याने नगरपंचायतीने शहरातील रस्ते खुले करावीत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ज्ञानेश्वर संस्थान व भक्त परिवाराने दि.17 पासून चक्री उपोषणाचा इशारा दिला आहे. आता व्यापार्‍यांनी नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणे काढण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेकायदा कारवाईविरोधात सोमवारपासून (दि.16) टपरीधारक संघटना व सर्व अतिक्रमण धारकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे प्रशासनापुढे चांगलाच पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

एकीकडे धार्मिक व भावनिक बाब, तर दुसरीकडे अतिक्रमण काढणार असल्यामुळे व्यापार्‍यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे व्यापारी उपोषण करणार असल्यामुळे प्रशासन चांगलेच कोंडीत सापडल्याचे चिञ शहरात निर्माण झाले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिराकडे येणार्‍या भक्त परिवाराच्या वाहनाला या रस्त्यातील अतिक्रमणामुळे गणपती मंदिरापासून चांगलाच अडथळा सुरु होत असल्याचे वास्तव चित्र आहे. ा त्यामुळे नेवासकर देवस्थान व भक्त परिवाराने चक्री उपोषणाचा सज्जड इशारा दिला आहे. भाविकांना दर्शनासाठी येण्यास अडथळा निर्माण होऊ नये, ही नेवासकरांची रास्त मागणी असतांना दुसरीकडे शहरातील व्यापारी व अतिक्रमणधारक संघटनेने दुसरे निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, आम्ही 40 ते 50 वर्षापासून ग्रामपंचायतीच्या संमतीने व्यवसाय करीत होतो.

ग्रामपंचायत आमच्याकडून करही वसूल करीत होती. त्यानंतर ग्रामपंचायतीचे रूपांतर नेवासा नगरपंचायतमध्ये होवून त्यानंतर नगरपंचायतीने सन 2018 मध्ये ठराव करून घेऊन अतिक्रमणधारकांना गाळे वाटप करण्यात येतील, अशा प्रकारचा ठराव समंत केला. त्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी अतिक्रमणधारकांनाच गाळे वाटप करण्यात येतील, असे पत्र संबंधित अतिक्रमणधारकांना दिले होते. त्यानंतर अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले होते. माञ, नगरपंचायतीने दिलेल्या आश्वासनाची अद्यापि पुर्तता केली नाही. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे व्यापार्‍यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा होत नसून, अतिक्रमण काढल्यास व्यापार्‍यांवर उपासमारीचे वेळ येईल, असे शहरातील व्यापार्‍यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशाराही व्यापार्‍यांनी दिला. त्यामुळे दोन विरोधाभासाच्या मागणीमुळे देवस्थान भक्त आक्रमक झाला आहे. अतिक्रमण काढणार असल्यामुळे भाविकांना व्यापार्‍यांच्या अतिक्रमनामुळे अडचण होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यामुळे दोन उपोषण मागेपुढे चालू होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा पेच उभा राहतो की, काय? असा सवाल नेवासकरांनी केला आहे.

संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख व व्यापार्‍यांची याबाबत बैठक झाली. यावेळी शिवाजी महाराज देशमुख यांनी सांगितले की, आमचा व्यापार्‍यांना कुठलाही प्रकारचा विरोध नाही. केवळ देवदर्शनासाठी येणार्‍या भाविकांना रस्त्यात अडथळा निर्माण होऊ नये, हीच मागणी असून,. तीर्थक्षेत्राचा भरभराट व्हावा व भाविकांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठीच भक्तपरिवाराचा लढा आहे, असेही यावेळी त्यांनी व्यापार्‍यांना सांगितले.

SCROLL FOR NEXT