संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उपकेंद्रातील वीज कर्मचारी सागर दत्तू भागवत याने 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा निंदनीय प्रकार उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, भागवतवाडीतील सागर भागवत या वीज कर्मचार्यावर अत्याचारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सात महिन्यांपूर्वी तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणार्या 16 वर्षीय विद्यार्थिनीची वीज कंपनीच्या उपकेंद्रात कार्यरत सागर दत्तू भागवत या तरुणाशी ओळख झाली.
'माझे तुझ्यावर प्रेम आहे,' असे म्हणत त्याने तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. वेळेवेळी अत्याचार केला. युवती गर्भवती राहिल्याची गंभीर बाब तिच्या घरच्यांच्या लक्षात आली. यानंतर हा प्रकार उघड झाला. पिडित तरुणीने तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वीज वितरण कंपनीचा कर्मचारी सागर दत्तू भागवत (रा. भागवतवाडी) याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास पो. नि. अरुण आव्हाड करीत आहे.