अहमदनगर

जय भीमच्या घोषाने दुमदुमले नगर

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित भीम महोत्सव उत्साहात साजारा करण्यात आला. मार्केटयार्ड येथील डॉ.आंबेडकर चौकातील पांजरापोळ मैदानात हा कार्यक्रम पार पडला. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी भीम महोत्सवाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन गीताने व गायिका कडूबाई खरात यांच्या विविध भीम गीतांनी करण्यात आली.

राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराजांचा पोवाडा व भीम गीते ऐकून प्रेक्षक व भीमसैनिक मंत्रमुग्ध झाले. उपस्थितांनी भीम गीतांवर ठेका धरला. आमदार जगतापही भीमसैनिकांसमवेत थिरकले. यावेळी आमदार जगताप म्हणाले, तरूण पिढीला समाज प्रबोधनाची गरज आहे. सर्वांनी महापुरुषांचे आचरण करण्याची गरज आहे. सुरेश बनसोडे यांनी स्वागत केले. यावेळी अंकुश मोहिते, अशोक गायकवाड, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, अजिंक्य बोरकर, अभिजीत खोसे, अजय साळवे, विशाल भिंगारदिवे, पप्पू पाटील, समीर भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, बाली बांगरे, सुजन भिंगारदिवे, महेश आठवले, निखिल कोल्हे, सतीश शिरसाट, येसुदास वाघमारे, सतीश साळवे, श्रीकांत भोसले, जय कदम, सुरज जाधव आदीसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT