अहमदनगर

नगर : तनपुरेंच्या कामाचे श्रेय लाटू नका ; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला इशारा

अमृता चौगुले

करंजी : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन अंतर्गत पाथर्डी तालुक्यात सुरू असलेली विकास कामे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पाठपुरावा करून मार्गी लावली आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार तनपुरे यांनी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.  पाथर्डी तालुक्यातील 33 गावांत 155 कोटी 59 लाख रुपये खर्चाच्या पाणीयोजनांचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेच्या कामाचा पाठपुरावा आमदार तनपुरे यांनी केला आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते.

त्यावेळी आमदार तनपुरे यांनी मंत्रि पदाचा पुरेपूर वापर करून टंचाईग्रस्त गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांमुळे विविध गावात पाणीयोजनेची कामे सुरू आहेत. या योजनेत चिचोंडी, करंजी, लोहसर, मांडवे, मोहोज बुद्रुक, मोहोज खुर्द, रेणुकाईवाडी, रुपेवाडी, शिराळ, तिसगाव, त्रिभुवनवाडी, धारवाडी, कडगाव, कौडगाव, निंबोडी, देवराई, घाटशिरस, डमाळवाडी, खांडगांव, जोहारवाडी ,सातवड शिरापूर, करडवाडीसह नगर तालुक्यातील पांगरमल, मजलेचिंचोली, तसेच राहुरी तालुक्यातील कात्रड व गुंजाळे आदी गांवात नव्याने जलकुंभ उभारणी होणार आहे, असे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.

केशव शिंगवे,पांगरमल ,शिराळ, आव्हाडवाडी, कोल्हार आदी गावात जलकुंभाचे सर्वेक्षण होणार आहे. पाथर्डी तालुक्यातील मिरी तिसगांव व इतर 33 गावातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. यापूर्वी ही योजना फक्त 30 गावांकरीता कार्यान्वित होती. सातवड, निंबोडी, त्रिभुवनवाडी, कौडगाव, शिरापूर, करडवाडी आदी गावांचा या योजनेत नव्याने समावेश करण्यात आल्याने या गावांचाही पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पोपटराव आव्हाड, युवानेते अमोल वाघ, सरपंच नितीन लोमटे, राजेश आंधळे, जालिंदर वामन, मच्छिंद्र सावंत, सुधाकर वांढेकर, के. एम. मचे आदी उपस्थित होते.

आमदार तनपुरे यांनी नळयोजनेसह विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामासाठी खर्‍या अर्थाने पाठपुरावा केला. त्यांच्या कामाचे श्रेय इतर कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये. आमदार तनपुरे कधीही इतरांच्या कामाचे श्रेय घेत नाहीत, असे देवेंद्र गिते, विष्णू पालवे, अंबादास डमाळे, भीमराज सोनवणे, राजेंद्र पालवे यांनी यावेळी सांगितले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT