अहमदनगर

शिर्डी : चुकीचे संदेश व्हायरल करू नका; श्रीसाईबाबा संस्थानकडून इशारा

अमृता चौगुले

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : देशभरातील काही हे नेटकरी हे समाज माध्यमावर कोणतीही शहानिशा न करता शिर्डीच्या साईबाबांबद्दल चुकीची अफवा पसरवून साईभक्तांच्या भावना दुखविण्याचे काम करीत असल्याच्या तक्रारी श्रीसाईबाबा संस्थांनकडे आल्या आहे. अशा बेजबाबदारपणे श्रीसाई संस्थानची बदनामी करणार्‍यांवर श्रीसाई संस्थानने गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. अशांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर श्रीसाईबाबा व साई संस्थान यांच्या बदनामीचा चुकीचा व्हिडिओ पसरवले जात असल्यामुळे जगभरातील लाखो साई भक्तांच्या भावना दुखावल्या जात असल्याच्या तक्रारी साई भक्तांनी संस्थांकडे आल्या. या व्हिडिओद्वारे श्रीसाईबाबा व साई संस्थानची बदनामी करणार्‍या व्यक्ती विरोधात साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

याबाबत श्रीसाई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवा शंकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती देताना सांगितले की, श्रीसाईबाबा व साई संस्थान बद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक चुकीचे वृत्त पसरवल्याबाबत अनेक साई भक्तांनी साई संस्थांकडे तक्रारी दाखल केल्या. त्यांची दखल घेऊन आपण जिल्हा पोलिस प्रमुख व राज्याच्या सायबर सेल प्रमुखांची चर्चा करून शिर्डी पोलिसात याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर क्राईम तपास सुरू केला आहे. भाविकांनी समाज माध्यमांवर फिरणार्‍या मेसेज वर विश्वास ठेवून नये. यापुढे श्रीसाईबाबा व साई संस्थान यांच्या विषयी चुकीचे माहिती प्रसारित करणार्‍यांविरोधात साई संस्थान गुन्हा दाखल करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडिओ मध्ये विशिष्ट धर्माचे चार ते पाच लोक एका दानपेटीतील पैसे गोण्यांमध्ये भरत असल्याचे दिसले. त्या व्हिडिओखाली काही समाजकंटकांनी खोडसाळपणा करत सदर व्हिडिओ शिर्डीच्या मंदिराचा असल्याचे सांगत साईबाबांचे पैसे एका विशिष्ठ धर्मासाठी वापर करत असल्याचे सांगत साईभक्त भाविकांची दिशाभूल करण्याचा तसेच साईभक्तांच्या श्रद्धेला ठेस पोहचवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र याबाबत साईबाबा संस्थान प्रशासनाने अधिकृतपणे या वृत्ताचे खंडण करत हा खोडसाळपणा असल्याचे जाहीर केले होते.

याच आठवड्यात हैद्राबाद येथील साईभक्त व निवृत्त न्यायाधीश बी. चंद्रकुमार यांना त्यांच्या मित्र प्रा. ब्रम्हानंदा यांनी सदर खोटी व साईबाबा संस्थानची बदनामी करणारी पोस्ट पाठवली असता बी. चंद्रकुमार यांनी त्यांच्या मित्राला ( प्रा. ब्रम्हानंदा चारी ) सदर पोस्ट खोटी असल्याचे सांगितले. ही पोस्ट कोठून आली असे विचारले असता, त्यांनी सदर पोस्ट ही दनजया मोन नामक व्यक्ती कडून आल्याचे सांगत त्याचे मोबाईल नंबर बाबत माहिती दिली. साईबाबा संस्थानने शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला.ब म्हणून तालुक्यातील 163 गावांतील शेतकर्‍यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे, असे ते म्हणाले.

यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर, भगवानराव इलग, गोकूळ दिघे, सचिन शिंदे, अशोकराव जर्‍हाड, तबाजी मुन्तोडे, निवृत्ती सांगळे, शिवाजीराव कोल्हे, जेहूरभाई शेख, अशोक खेमनर, सुनिल मुन्तोडे, सतिष जोशी, भारतराव गीते, रमेश गीते, श्रीकांत गोमसे, शिवाजी इलग, राजेंद्र जाधव, अशोक खेमनर, मोहीत गायकवाड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT