अहमदनगर

नगर : खासगी व्हिडिओ व्हायरल करून डॉक्टरला धमकी

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : सोशल मिडियावर 'खासगी' फोटो मॉर्फ करून तो व्हायरल करून एका डॉक्टरची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोटो डिलीट करण्यासाठी डॉक्टरांकडून 43 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत बदनामी झालेल्या डॉक्टरने भिंगार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या डॉक्टरला शुक्रवारी (दि.17) त्यांच्याव्हॉटस्अ‍ॅपवर एक व्हिडीओ आला.

त्यात समोरील व्यक्तीसोबत केलेल्या चॅटींगचे फोटो व डॉक्टरचे खासगी फोटो एडीट करून तो व्हिडीओ डॉक्टरांच्या संपर्कातील इतरांना पाठविण्यात आला. व्हिडीओ डिलीट करायचा असेल तर 21 हजार 500 रुपये पाठविण्याचे समोरील व्यक्तीने फोनवरून सांगितले. त्यांनतर डॉक्टरांनी दोन वेळेस 21 हजार 500 असे 43 हजार रुपये समोरील व्यक्तीला पाठविले. त्यानंतरही व्हिडीओ डिलीट न केल्यामुळे डॉक्टरांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

SCROLL FOR NEXT