Shree Saibaba Temple | साईचरणी १.२० कोटींचा ५४ किलो चांदीचा नंदी अर्पण 
अहमदनगर

Shree Saibaba Temple | साईचरणी १.२० कोटींचा ५४ किलो चांदीचा नंदी अर्पण

दहा तोळे सोन्याची शिंगे, नंदीची श्री साईबाबा समाधी मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना

पुढारी वृत्तसेवा

अहिल्यानगर : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील साईभक्ताने श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुमारे १० तोळे सोन्याची शिंगे असलेला ५४ किलो ६५ ग्रॅम चांदीचा नंदी व बेस साईबाबा चरणी अर्पण केला. देणगी म्हणून प्राप्त झालेल्या सोने व चांदीच्या अलंकाराची किंमत १ कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. भक्ताच्या विनंतीनुसार देणगीदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.

श्री साईबाबा समाधी मंदिरातील श्रींच्या मूर्तीसमोरील जुन्या नंदीचे विधिवत उत्तरपूजन करून, श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्याने अर्पण करण्यात आलेल्या नंदीची धार्मिक विधीपूर्वक प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली. आग्रा येथील साईभक्तांनी अर्पण केलेल्या चांदीच्या नंदीचे वजन २७ किलो २७ ग्रॅम असून, त्याचे मूल्य ६० लाख २७ हजार असल्याचे सांगण्यात आले. नंदीसाठी अर्पण करण्यात आलेल्या चांदीच्या बेसचे वजन २७ किलो ३८ ग्रॅम असून, त्याचे मूल्य ६० लाख २९ हजार इतके आहे.

चांदीचा नंदी व बेसचे वजन ५४ किलो ६५ ग्रॅम त्याची किंमत १ कोटी २० लाख ५६ हजार असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले. या चांदीच्या नंदीला विशेष धार्मिक व अलंकारिक स्वरूप देण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचे शिंग (शिंग कव्हर) व सोन्याची बिंदी देखील अर्पण करण्यात आली आहे. सोन्याच्या शिंगाचे वजन ६९ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम, बिंदीचे वजन २९ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम आहे. त्याचे मुल्य १३ लाख ८५ हजार इतके आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT