अहमदनगर

नगर : कारभारणींच्या हाती विकासाचा दोर !

अमृता चौगुले

ज्ञानदेव गोरे : 

वाळकी : नगर तालुक्यात 27 पैकी 19 गावांच्या सरपंचपदाचा मान महिलांना मिळाला आहे. या गावांच्या विकासाचा दोर कारभारणींच्या हाती आला आहे.  काही गावांमध्ये महिला आरक्षणाने प्रस्थापितांना धक्का बसला असला, तरी त्यांनी आपल्या सौभाग्यवतींना राजकारणात पुढे करत विकासाची गंगा पुढे नेण्याचे काम केले आहे. राजकारणात नव्याने आलेल्या महिला देखील प्रशासन व विरोधी गटाला विकासकामांबाबत हातळताना आपली कुशलता दाखविण्या बरोबरच आपणही कशातही कमी नसल्याचे दाखवून देत आहेत.
तालुक्यातील 27 पैकी 19 ग्रामपंचायतीत महिला कारभारी बनल्या आहेत . या महिलां सरपंचावर गावच्या विकासकामाची मोठी जबाबदारी आली आहे. गावात विकासकामांची गंगा वाहताना त्या आपल्यातील असलेले राजकीय कौशल्य पणाला लावतील आणि आपणही कमी नसल्याचे दाखवून देतील.

जनतेतून सरपंचपदी निवडीनं आनंंद झाला. सामान्य जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ग्रामपंचायतीसाठी मिळणारा विकास निधी भेदभाव न करता समान खर्च करणार आहोत पहिल्यांदाच सरपंच झाले असले तरी मला घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे . विकास कामे करून विश्वास सार्थकी लावणार आहे.
इंदूबाई रणसिंग, सरपंच, वडगाव तांदळी

राळेगण म्हसोबामध्ये 55 वर्षांपासून आमची सत्ता आहे. यावेळी मतदारांनी मोठ्या विश्वासाने सरपंचपदाची संधी दिली. गावाच्या विकासाला आम्ही बांधील आहोत. वाड्या-वस्त्यांवर स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे, रस्त्यांची कामे करणे. याबरोबरच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उद्योग व्यवसाय सुरू करून माहिला सबलिकरणाला महत्त्व देणार आहोत
दीपाली भापकर, सरपंच राळेगण, म्हसोबा

या गावांत आहेत महिला सरपंच

वडगाव तांदळी : इंदूबाई रावसाहेब रणसिंग,
राळेगण म्हस्कोबा : दीपाली सुधीर भापकर, दहिगाव : सुरेखा मधुकर म्हस्के, सारोळा बद्दी : गयाबाई शंकर डहाणे,आठवड : सविता सुनील लगड, बाबुर्डी बेंद : मंदा सुनील खेंगट, रांजणी : लहानूबाई अरुण ठोंबे, कापूरवाडी : जनाबाई साहेबराव दुसुंगे,कौडगाव जांब : सविता रावसाहेब खर्से, पिंपळगाव लांडगा : अनिता दिनकर लांडगे, नारायणडोहो : श्रद्धा बाळासाहेब साठे, शेंडी : प्रयागा प्रकाश लोंढे, सारोळा कासार : आरती रविंद्र कडूस, उक्कडगाव : हेमलता नवनाथ म्हस्के, पिंपळगाव कौडा : प्रतिभा बाळासाहेब शिंदे, नेप्ती : सविता संजय जपकर, आगडगाव : आशाबाई परमेश्वर पालवे, खातगाव टाकळी : रुथा छगन वैराळ, टाकळी खातगाव : सुनीता राजू नरवडे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT