अहमदनगर

नगर : पोलिस उपअधीक्षकांचा वाहनचालक बेपत्ता

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या शासकीय वाहनावरील पोलिस चालक बेपत्ता झाला आहे. महादेव नाना लगड (वय 36, रा.शाहुनगर, केडगाव) असे बेपत्ता पोलिस चालकाचे नाव आहे. कोतवाली पोलिसांकडून लगड यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी (दि.16) लगड हे त्यांच्या शाहुनगरातील घरी होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते बॅगेची खराब झालेली चेन नीट करून आणतो, असे सांगून घरातून निघाले.

रात्री उशिरापर्यंत ते परत घरी न आल्याने कुटुंबियांनी फोनवरून संपर्क केला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लगड यांच्या पत्नीने कोतवाली पोलिस ठाण्यात या महादेव लगड बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिस कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली असून, लगड यांचा कोतवाली पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पोलिस कर्मचारी महादेव लगड हे केडगाव परिसरातील शाहूनगर येथील राहत्या घरातून एका कामासाठी जातो, असे सांगून निघून गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली असून, त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

                                                  – चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कोतवाली.

SCROLL FOR NEXT