अहमदनगर

नगर : व्यापार्‍यावर चोरट्यांचा जीवघेणा हल्ला

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  nagar nआहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज पाथर्डी शहर बंद ठेवून व्यापारी मोर्चा काढणार आहेत. व्यापारी चिंतामणी हे गुरूवारी (दि.23) सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांचे दुकान बंद करून घरी निघाले होते. साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराजवळ मोटर सायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला गाडी आडवी लावली. त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून त्यांच्याकडील दुकानांच्या चाव्या घेऊन गेले. या हल्ल्यात चिंतामणी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच शहरातील व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून आज पाथर्डी शहर बंद ठेवून, सकाळी दहा वाजता नवी पेठ येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, बंडू भांडकर, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, बंडू भांडकर, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरूडे, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, महेश बोरुडे, राजेंद्र शेवाळे, रामनाथ बंग, मोदक मानूरकर आधी राजकीय सामाजिक व व्यापारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तत्पूर्वी चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान, चोरट्यांनी किती मुद्देमाल लांबविला याचा तपशील मिळू शकला नाही. शहरातील वाढत्या चोर्‍या व हल्ले पाहता जनते मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT