अहमदनगर

पारनेर : ‘रास्तारोको’तील 41 जणांवर गुन्हे

अमृता चौगुले

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  आमदार नीलेश लंके यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुपा येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यात तब्बल 41 कार्यकर्त्यांवर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन साठे यांनी रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी सुपा चौकात वाहनावर ( एमएच 12 पीक्यू 1450) अनधिकृतपणे ध्वनिक्षेपक लावला. कार्यकर्ते सतीश भालेकर, बाबाजी तरटे, राजू शिंदे यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे कार्यकर्त्यांना जमवले. सकाळी रस्ता अडविला. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे.

याबाबत पोलिस नाईक यशवंत ठोंबरे यांच्या फिर्यादीनुसार सचिन गुलाब पठारे, कारभारी भाऊसाहेब पोटघन, सागर रमेश रोकडे, आकाश शांतीलाल पठारे, राजू नामदेव रोकडे, लोकेश अनिल पठारे, दिलीप नगरे, सचिन गोरख रासकर, जगदीश पोपट साठे, युवराज चंदर साठे, उत्तम अनंतराव पठारे, बाळासाहेब काशिनाथ शिंदे, अतुल गेनू दळवी, संदीप वसंत साठे, पोपट मोकाटे, सतीश मोहन भालेकर, किशोर भास्कर थोरात, विजय सदाशिव औटी, भूषण शेलार, सचिन अनिल साठे, जितेश सरडे, अमित जाधव, अमोल पवार, शरद आबा पवार, राजू सखाराम शिंदे, बाबाजी तरटे, बाळू वसंत दळवी, फिरोज गुलाब हवालदार, बाजीराव आनंदा दुधाडे, सचिन भास्कर पवार, विजू दिवटे, किशोर नामदेव यादव, अक्षय थोरात, भाऊसाहेब भोगाडे, संदीप चौधरी, शाहरुख शेख, दीपक आनंदा पवार, विजय नगरे, प्रकाश गुंड, सचिन काळे, भाऊसाहेब सोंडकर यासह दहा ते बारा जणांविरोधात गुन्हे दाखल केले.

SCROLL FOR NEXT