श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील कारेगावमधून शेतकर्याचे 11 तर घुमनदेवमधून 9 स्प्रिंकलर गन असे एकूण 20 स्प्रिंकलर गन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कारेगाव येथील शेतकरी कैलास निवृत्ती पटारे यांच्या शेती गट नं 414 अ (1) मधून जैन एरिगेशन कंपनीचे 11 पितळी स्प्रंक्लर गन अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.
याप्रकरणी कैलास निवृत्ती पटारे यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घुमनदेवमध्ये येथील शेतकरी भैरव भाऊसाहेब कांगुणे यांच्या शेतीमधून 9 स्प्रिंकलर गन चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी भैरव भाऊसाहेब कांगुणे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली.
हेही वाचा