अहमदनगर

नगर : तृणधान्य उत्पादन वाढीसाठी जनजागृती करा : डॉ. भोसले

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीबरोबरच जनमासानसाच्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचे प्रमाण वाढविण्यासाठी पौष्टिक तृणधान्याच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात यावी. तसेच मिलेट ऑफ द मंथ (तृणधान्य विशेष महिना) ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरे करण्याबाबत जिल्हास्तरीय कार्यकारीसमितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कृषी उपसंचालक रवींद्र माने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, पौष्टिक तृणधान्य संकल्पनेतर्गत ज्वारी,बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा या पौष्टिक तृणधान्याचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याने याबाबत सर्व माध्यमाद्वारे व्यापक स्वरुपात जागृती करण्यात यावी. जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या कृषि महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्याचे स्वतंत्र दालन उभारण्यात येऊन या ठिकाणी तृणधान्याची ओळख होण्यासाठी धान्य त्याच्या तपशिलासह उपलब्ध करुन द्यावा. त्याचबरोबर दर्शनी भागामध्ये सेल्फी पॉईंट उभारण्याच्या सुचनाही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप व कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरे करण्याबाबत कृषि विभागामार्फत करण्यात आलेल्या तयारीची माहिती यावेळी दिली.

SCROLL FOR NEXT