अहमदनगर

कोपरगाव : तब्बल 1 कोटी 34 हजारांचा गांजाचा कंटनेर पकडला

अमृता चौगुले

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर- मनमाड महामार्गावर इंदोर येथून येवला- कोपरगाव मार्गे पुण्याकडे गुटख्याचा कंटेनर जाणार असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचत कोपरगाव तालुका पोलिसांनी कंटेनरसह सुगंधी तंबाखू आणि सुपारी असा एकूण 1 कोटी 34 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी कंटेनरसह एकाच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर पोलिसांना खबर्‍यामार्फत गुटख्याचा कंटेनर जाणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पथकाने सापळा रचला. एमपी 09 जी.जी 2900 क्रमांकाचा कंटेनर इंदोर येथून येवला कोपरगाव मार्गे पुण्याकडे जात असताना सापळ्यात अडकला. पोलिसी खाक्या दाखवताच यामध्ये गुटखा असून तो पुण्याकडे घेऊन चालल्याचे आरोपींनी सांगितले. कंटेनरची पाहणी करताना कंटनेरमध्ये बेसन सोयाबीनसह गुटखा आढळून आला.

पोलिसांनी कंटेनरसह एकाला ताब्यात घेतले. कंटेनर चालक जमील अहमद इद्रीस (वय 45 रा. रणसिका जि. पलवला) यांला ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनानुसार पो. नि. वासुदेव देसले, महेश कुसारे, सहा. पो. सुरेश गागरे, पो. कॉ. अंबादास वाघ, पोकों, रशिद शेख, पो. कॉ. जयदीप गवारे, पोना, रामा साळुंके यांच्या पोलिस पथकाने यशस्वी केल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पोलिसांनी केली सर्वात मोठी कारवाई..!

राज्यातील ही एक मोठी कारवाई तर कोपरगाव तालुका पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले. दरम्यान, एकाला ताब्यात घेतले आहे. चौकशी केली जात आहे. यातून मोठे रॅकेट बाहेर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT