संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होत असून शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक आहे. काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण आहे. या मतदारसंघावर काँग्रेसने आढावा बैठकीत दावा सांगितला. तशी माहितीही काँग्रेस पक्षाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संगमनेर येथे आयोजित आढावा बैठकीनंतर यशोधन कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ज्ञानेश्वर गायकवाड, करण ससाने, उत्कर्ष रूपवते, हेमंत ओगले, सचिन गुंजाळ, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, ज्ञानदेव वाफारे आदी उपस्थित होते.
हांडोरे म्हणाले, कोअर कमिटीच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या जागां चा आढावा घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे प्राबल्य जास्त आहे. त्यानुसार जागांची विभागणी केली जाणार आहे. याच माध्यमातून सामान्य जनतेत कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस पक्षाचा विचार पोहोचविला जाणार आहे. या बैठकांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका , स्थानिक स्वराय संस्था यांचाही आढावा घेतला जाणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाने लढवावा, अशी कार्यकर्ते पदाधिकारी यांची मागणी आहे. पक्षात नवीन पदाधिकार्यांना संधी देण्यात येणार आहे. देशात व राज्यात सध्या भाजप विरोधात परिवर्तनाची लाट सुरू असून महाराष्ट्रातून सर्वाधिक काँग्रेस खासदार निवडून देण्याचा मानस असल्याचेही ते यावेळी म्हणाले. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये संधी मिळावी, अशी येथील कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे डॉ. तांबे यांना सन्मानाने काँग्रेसमध्ये घ्या, असा ठराव आज जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. यावर निरीक्षक हांडोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर मागणी प्रदेश काँग्रेसकडे कळवू, असे आश्वासन दिले.
यावेळी अजय फटांगरे, सुधीर नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे, निखिल पापडेजा गौरव डोंगरे, रमेश गफले आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद कानवडे यांनी तर आभार सोमेश्वर दिवटे यांनी मानले.
हेही वाचा :