नगर : पुढारी वृत्तसेवा
अहिल्यानगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळानगर, विळद येथील पंपिंग स्टेशनवरील विद्युत पंपाचा वीजपुरवठा गेल्या चार दिवसांत सात वेळा खंडित झाला. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहराला पाणीपुरवठा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
अहिल्यानगर शहराला मुळा धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. पाईलपाईनद्वारे मुळानगर येथून पाणी विळद येथे आणले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुळानगर व विळद येथील पंपिंगस्टेशनचा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणी उपसा करण्यास अडथळा निर्माण होत आहे.
साधारण पाच मिनिट वीजपुरवठा खंडित झाला तर पुन्हा पाणी उपसा सुरू होण्यास आणि पाणी वसंत टेकडी येथे पोहोचण्यास दोन ते तीन दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे निर्धारित वेळेत पाणी उपसा न झाल्याने वसंत टेकडी येथील पाण्याचा टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत.
परिणाम शहरातील पाणीपुरवठाही पूर्ण दाबाने होत नाही. सर्वत्र पूर्ण दाबाने पाणी पोहोचण्यास अडचणी निर्माण होतात गेल्या पाच दिवसांपासून शहर पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्या शहराच्या मध्यवर्ती भागास उपनगरास पाणीपुरवठा वेळेत व पूर्ण दाबाने होत नाही.
सातत्या वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांन महावितरणच्या अधिकाऱ्यांश पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून उचित कार्यवाही करण्यात आलेले नाही. अनेक दिवसांपासून सातत्याने वीजपुरवत्त खंडित होण्याची मालिका सुरूच आहे