अहमदनगर

राहुरी : अनुदानासाठी ‘प्रहार’चे बच्चू कडूंना साकडे!

अमृता चौगुले

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : अ. नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानीचे अनुदान शेतकर्‍यांंना त्वरित मिळावे, या मागणीचे प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांनी माजी मंत्री आ. बच्चु कडु यांना साकडे घातले. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पाटोदा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघातील सुरेश लांबे यांनी माजी मंत्री आ. बच्चु कडु यांना भेटून निवेदन देत ही मागणी केली.

निवेदनात लांबे म्हणतात, गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सर्व शेतकर्‍यांचे सरसकट पंचनामे करण्यात आले. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली, परंतु नगर जिल्ह्यात शेतकर्‍यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही. दरम्यान, याबाबत आ. बच्चु कडु यांच्याशी चर्चा करताना लांबे म्हणाले, नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टी अनुदानासह कांदा, कापुस, ऊस आदी शेतीमालास हमीभाव मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावे.

पुढील काळात हमीभावापेक्षा कमी भावात शेतमाल विकल्यास शेतकर्‍यांना अनुदान स्वरुपात त्वरित मदत द्यावी, अशी मागणी केली.
या शिष्टमंडळात प्रहारचे लांबे यांच्यासह युवा तालुकाप्रमुख ऋषीकेश इरुळे, उपतालुकाप्रमुख युनुस देशमुख, बाबासाहेब भड व कार्यकर्त्यांचा समावेश होता, असे सांगण्यात आले. प्रहारने शेतकर्‍यांविषयी दाखविलेल्या तळमळीचे कौतुक होत आहे.

SCROLL FOR NEXT