अहमदनगर

नगर : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज गहिनीनाथ गडावर

अमृता चौगुले

चिंचपूर पांगुळ : पुढारी वृत्तसेवा  :  राज्यभरात लाखोंच्या संख्येने भक्तगण असणारे नगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीवरील संत वामनभाऊ महाराज यांच्या 47 वा पुण्यतिथी सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी (दि.15) रोजी महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणार आहे.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, आमदार सुरेश धस, भीमराव धोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री. क्षेत्र गहिनीनाथ गड (ता.पाटोदा) येथे सकाळी पारंपरिक महापूजा होणार आहे. त्यानंतर महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर समाधीवर दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT