अहमदनगर

नगर : पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही ! वेतन पथक अधीक्षक कार्यालयात अनागोंदी

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी व वेतन पथक अधीक्षक कार्यालयातील अनागोंदी थांबविण्यासाठी नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची भेट घेऊन चर्चा केली. तर, वेतन पथक अधीक्षक कार्यालयाबद्दल शिक्षकांकडून अनेक तक्रारी असून, ते त्वरित न थांबल्यास शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार घेऊन जाणार असल्याचा इशारा शिष्टमंंडळाने दिला.

जिल्ह्यात शिक्षक-शिक्षकेतरांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, या संदर्भात माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, नंदकुमार शितोळे, देविदास पालवे, रमाकांत दरेकर, बद्रिनाथ शिंदे, प्रसाद साठे, दीपक दरेकर, अर्जुन भुजबळ, रामकृष्ण डांगे आदींनी शिक्षणाधिकार्‍यांचे लक्ष वेधले. यावेळी वेतन पथक अधीक्षक कार्यालयाकडून कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय होत नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तर, याबाबत जिल्हाभरातून शिक्षकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याचे शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी कडूस यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर, याबाबत त्वरित वेतन पथक अधीक्षक कार्यालयातील जबाबदार अधिकार्‍यावर कारवाई करावी, व अन्य प्रश्न सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता जमा झालेला नाही, मेडिकल बिले येणे बाकी, निवृत्त शिक्षकांची फरक बिले प्रश्न, दप्तर दिरंगाई बाबत अनेकवेळा तक्रारी करुन दुर्लक्ष, पगार बिलाचे स्क्रोल अद्याप पर्यंत अप्राप्त, कर्मचारी भेटी संदर्भात फलक लावणे, इत्यादीबाबत यावेळी चर्चा झाली.

SCROLL FOR NEXT