अहमदनगर

कर्जत : कारची काच फोडून तेरा लाखांची रोकड लंपास

अमृता चौगुले

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बेनवडी येथील अतुल नवनाथ गदादे यांची कार घराजवळ लिंबाच्या झाडाखाली लावलेली असताना मागच्या बाजूची काच दगडाने फोडून तेरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. पोलिसांनी सांगितले, की गदादे यांनी कर्ज नवे-जुने करण्यासाठी राशीन येथून द्राक्षविक्रीचे तेरा लाख रुपये कारमधून (एमएच 42 बीबी 3251) आणले होते. नातेवाईक आल्याने ते घरी आले.

घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे घराजवळच असलेल्या लिंबाच्या झाडाखाली त्यांनी कार उभी केली होती. थोड्या वेळाने ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या कारची पाठीमागची काच फोडून आत पिशवीत ठेवलेली तेरा लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबविल्याचे आढळून आले. त्यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT