अहमदनगर

अकोले : बेकायदा मद्यविक्री करणार्‍यावर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

अकोले; पुढारी वृत्तसेवा : राजूरमध्ये दिगबंर रोडजवळ चैतन्य हॉटेलच्या आडोशाला अमोल सूर्यकांत कानकाटे 840 रुपये किमतीचे देशी बॉबी संत्रा मद्य चोरून विकताना आढळल्याने राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दारू बंदी असलेल्या राजूर गावात अवैध दारू विकणार्‍यांचा शोध स.पो.नि. गणेश इंगळे हे घेत असताना दिगंम्बर रोडजवळ चैतन्य हॉटेलच्या आडोशाला कानकाटे 840 रुपये किमतीची देशी बॉबी संत्रा मद्य बेकायदेशीर जवळ बाळगून त्याचा स्वतःच्या फायद्याकरिता चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने मिळाला आहे. राजूर पोलिसांनी अमोल कानकाटे यांच्या विरोधात रजि क्र 38/ 2023 कलम मु.प्रो.अ‍ॅक्ट 65(इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास स.पो.नि.गणेश इंगळे व पो. हे.काँ. भडकवार करीत असल्याचे सांगण्यात आले. बेकायदा मद्य विकले जात असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

SCROLL FOR NEXT