अहमदनगर

सोनई : तीन गावठी कट्ट्यांसह 5 जिवंत काडतुसे हस्तगत

अमृता चौगुले

सोनई : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई फाट्यावर विक्रीसाठी आणलेले 2 गावठी कट्टे, एक सिंगल बोर गावठी रिव्हॉल्व्हर व 5 जिवंत काडतुसे हस्तगत करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व हत्यार्‍याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून माहिती एक व्यक्ती गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्रीसाठी शिंगवे तुकाई फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यावरून पोलिसांनी परिसरात सापळा रचला असता, एक संशयित व्यक्ती कापडी पिशवी घेऊन शिंगवे तुकाई फाट्याजवळील कमानीजवळ उभा असलेल्या शुभम सुभाष सरोदे (वय 22, रा. गुंजाळे, ता. राहुरी) त्याच्याकडून 2 गावठी कट्टे, एक सिंगल बोर गावठी रिव्हॉल्व्हर व 5 जिवंत काडतुसे असा 86 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस नाईक संदीप संजय दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक तुपे करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, हवालदार विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोलिस नाईक शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले व भरत बुधवंत यांनी केली.

SCROLL FOR NEXT